शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (15:35 IST)

राज्यातील ह्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता !

मध्य प्रदेश ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्याने राज्यातील विदर्भ व मराठवाड्यात या आठवड्यात पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे.विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बुधवारी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. विदर्भात पारा चाळिशीपार पोहोचला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमानात वाढ झाली आहे.विदर्भ व मराठवाड्यात चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगण, रायलसीमा ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भात गुरुवार, तर मराठवाड्यात शनिवारपासून पावसाची शक्यता आहे.
 
विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उस्मानाबाद, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांसह इतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील कमाल तापमान वाढले आहे.बुधवारी यवतमाळात सर्वाधिक ४१.७ अंश तापमानाची नोंद झाली. प्रमुख शहरांतील कमाल तापमान : सोलापूर ३९.७, जळगाव ३८, नाशिक ३५.८, पुणे ३७.१, अकोला ३९.१, अमरावती ३८, यवतमाळ ४१.७, वर्धा ४०, नागपूर ३९.२, औरंगाबाद ३७, परभणी ३९.७ अंश सेल्सियस.