मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

चंद्रपूर येथे 571 पदांच्‍या निर्मीतीला मंजूरी

चंद्रपूर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय येथे 571 पदांच्‍या निर्मीतीला मंजूरी
वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे सुरू करण्‍यात आलेल्‍या 500 खाटांच्‍या रूग्‍णालयाकरिता 571 पदांची चार टप्‍प्‍यात पदनिर्मीती करण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे. यासंदर्भात राज्‍य शासनाच्‍या वैद्यकिय शिक्षण व औषधीद्रव्‍ये विभागाने दिनांक 9 जानेवारी 2017 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे वर्ग- 1 ची 2, वर्ग-2 ची 6 तर वर्ग-3 ची 563 अशी एकूण 571 पदे निर्माण करण्‍याच्‍या प्रस्‍तावाला मान्‍यता देण्‍यात आली आहे. वर्ग-1 च्‍या पदांमध्‍ये वैद्यकिय अधिक्षक, वैद्यकिय अभिलेख अधिकारी अशी एकूण 2 तर वर्ग-2 च्‍या पदांमध्‍ये निवासी वैद्यकिय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधिसेविका, जीव रसायन शास्‍त्रज्ञ, मुख्‍य औषध निर्माता, क्लिनिकल सायकॉलॉजीस्‍ट यांची प्रत्‍येकी 1 याप्रमाणे एकूण 6 पदांचा समावेश आहे. वर्ग-3 च्‍या 563 पदांमध्‍ये सहा अधिसेविका 1, कार्यालयीन अधिक्षक 3, समाजसेवा अधिक्षक 4, भौतिकोपचार तज्ञ 1, परिसेविका 50, सार्वजनिक आरोगय परिचारीका 4, वरिष्‍ठ सहाय्यक 6, अधिपरिचारीका 375, स्‍पीच थेरपीस्‍ट 1, आहारतज्ञ 1, लघुलेखक 1, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 24, क्ष-किरणतत्रज्ञ 4, निर्जतुकीकरण तंत्रज्ञ 3, प्‍लास्‍टर तंत्रज्ञ 2, औषधनिर्माता 15, दंत तंत्रज्ञ/ दंत आरोग्‍यक 1, वरिष्‍ठ लिपीक 20, प्रयोगशाळा सहायक 12, क्ष-किरण सहायक 7, कनिष्‍ठ लिपीक 15, वस्‍त्रपाल 2, वाहक चालक 8, नळ जोडारी 2, जोडारी 1, सुतार 2 या पदांचा समावेश आहे.वित्‍तमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकारामुळे सुरू करण्‍यात आलेल्‍या शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालयातील रूग्‍णसेवा प्रभावीपणे राबविण्‍याची प्रक्रिया या पदनिर्मीतीच्‍या माध्‍यमातुन अधिक सुदृढ व सक्षम होणार आहे.