1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जुलै 2023 (07:20 IST)

MPSC परीक्षेच्या निवड प्रक्रियेत बदल

MPSC
Changes in MPSC Exam Selection Process याआधी MPSC परीक्षेत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी करण्यात येत होती. यामुळे मुलाखतीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली असता ते पात्र उमेदवार तपासणीत बाद ठरत होते. ज्यानंतर या उमेदवारांची अन्य पदावर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येत होते. त्याचप्रमाणे अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरत असल्याचे स्पष्ट होत होते. यावर उपाय म्हणून राज्यसेवा परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून आलेला वैद्यकीय अहवाल आणि उमेदवारांनी दिलेला पदांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन अंतिम शिफारस करणे शक्य होण्यासाठी वैद्यकीय चाचणीसंदर्भातील कार्यपद्धती बदलण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
 
मुलाखतीपूर्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केल्यापासून नियुक्ती देण्याचा कालावधी एक वर्षापेक्षा जास्त झाल्यास शिफारसपात्र उमेदवारांची नियुक्तीपूर्वी पुन्हा वैद्यकीय तपासणी होणार आहे. अशी माहिती नवी शासन पत्रात नमूद करण्यात आलेली आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना एमपीएससीकडून वैद्यकीय चाचणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी पुरेशी विभागीय वैद्यकीय मंडळे स्थापन करून वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येईल. त्यासाठी एमपीएससीकडून सूचनांसह वैद्यकीय तपासणीपत्र ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना देण्यात येईल, अशी महत्त्वाची माहिती देखील देण्यात आली आहे.
 
तसेच, वैद्यकीय तपासणीनंतरच्या अहवालावर उमेदवाराला दाद मागायची असल्यास त्यासाठी एमपीएससीकडून सात दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. दाद मागण्यासाठी उमेदवाराच्या खात्यात अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. मुंबईतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात अपिलीय वैद्यकीय मंडळ याची सरकारकडून सुरुवात करण्यात येणार आहे. वै