बारामतीत पार्थ पवारांच्या बैठकीत राडा, पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी , एकमेकांशी भिडले
बारामतीत खासदार पार्थ पवार यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी आणि धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे.पदाधिकाऱ्यांची बैठक पार्थ पवार यांनी त्यांच्या सहयोग या निवासस्थानी बोलावली असताना हा प्रकार घडला.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यात वादावादी झाली आणि ते एकमेकांशी भिडले. वादाचे कारण मात्र कळू शकले नाही. वादाला थांबवण्यासाठी पार्थपवारांनी मध्यस्थी केली. त्यांनतर तिथे वातावरण शांत झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नसला तरीही पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवारांच्या विजयाचे फ्लेक्स झळकले आहे.
Edited By - Priya Dixit

