मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 जून 2021 (21:06 IST)

माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मी मॅनेज होईन का? - संभाजीराजे

Chhatrapati's rites on me
माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत, मी मॅनेज होईन का? असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीकाकारांना उद्देशून विचारला आहे.ते कोल्हापुरात मराठा संघटनांच्या समन्वयकांशी संवाद साधताना बोलत होते.
 
नाशिकमधील मूक आंदोलनानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला 21 दिवसांची मुदत दिलीय. संभाजीराजेंच्या या भूमिकेवर काहींनी प्रश्न उपस्थित केले. यालाच संभाजीराजेंनी उत्तर दिलंय.
 
राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीतली चर्चेची माहिती संभाजीराजेंनी मराठा संघटनांच्या समन्वयकांना दिली.
 
"जे लोक ठोक मोर्चाची भाषा करतात, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, त्याचे काय परिणाम होतील. कोरोनाचं संकट आहे, कोल्हापूरकरांनी हे संकट वाढवलं हा ठपका आपल्यावर बसेल. त्यामुळे आरोग्याचा विचार करून निर्णय घेत आहोत," असंही संभाजीराजे म्हणाले.