शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तुमची संपत्ती दाखवा: मुख्यमंत्री

मला राजकारणात 25 वर्ष झाली आहेत. तर दुसरीकडे इतरांची जशी संपती वाढली तशी पण माझी संपत्ती वाढली नाही. जी संपती वाढली ती बाजारभाव वाढले आहेत म्हणून, मात्र तुम्ही सांगा, साहेब किंवा त्यांचे बोलके पोपट हे त्यांची संपत्ती घोषित करणार?
 
25 वर्षाच्या राजकारणात माझं दामन साफ आहे. पण जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नये.’ अशी जबरदस्त टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच्यावर केली आहे. साकीनाका येथील सभेत बोलत होते. शिवसेनेचं मराठी प्रेम कुठे, यांची एकच नीती मराठी माणसाच्या नावाने संघर्ष करत आपण श्रीमंत व्हायचं.’ अशी बोचरी टीकाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केली. त्यामुळे आता उद्धव काय उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.