गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (21:42 IST)

आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवत नाही, आम्ही जनतेत जातो म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

uddhav eknath
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. महायुती सरकारला दोन वर्षे झाली असून या सरकारने बरीच कामे केल्याचा दावा मुख्यमंत्री यांनी केला. मग ते रस्ते असो किंवा मेट्रो. त्यांनी मागील उद्धव सरकारला फेसबुक लाईव्ह सरकार म्हणत टोला लगावला.

शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या विकासाच्या प्रवासात महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभे असणार असे म्हटले. काँग्रेसवर हल्लाबोल करत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात जे काही कामे केली आहेत. ते काँग्रेसला 50 -60 वर्षात देखील करता आली नाही. 10 वर्षात जेवढा विकास झाला. आपल्या देशाची कीर्ती जगभरात वाढली. पूर्वी भारत एक मागासलेला देश म्हणून ओळखला जात होता. मात्र आता भारत बोलतो आणि जग ऐकते.त्यांच्या तिसरा टर्म मध्ये भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 
 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आम्ही सतत जमिनीवर राहून लोकांमध्ये काम करत असल्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याची गरज नाही. निवडणुका बघून आम्ही काम करत नाही…जनतेला सगळं माहीत आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी नेहमीच काम करत राहीन.

दोन वर्षांच्या कार्यकाळावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “2 वर्षांचा कालावधी कमी आहे पण या काळात महायुती सरकारने खूप काम केले आहे, याचा मला खूप आनंद आहे. विरोधकांच्या महाविकास आघाडीने ज्या योजना बंद केल्या, कारशेड असो, मेट्रो असो की रस्ते, त्या सगळ्या आम्ही पुन्हा सुरू केल्या... हे जनतेचे सरकार आहे, घरी बसणारे किंवा फेसबुक लाईव्हवर फिरणारे सरकार नाही. हे लोकांमध्ये जाणारे सरकार आहे, हे लोकांचे सरकार आहे.”

Edited by - Priya Dixit