शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (21:57 IST)

मिलिंद नार्वेकरांच्या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणतात ...

shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मिलिंद नार्वेकरांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदेंना विचारले असता ते म्हणाले की, त्याची मला माहिती नाही. मी काही लपवून ठेवत नाही. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नसतं. जे असतं ते खुल्या दिलाने आपल्याला सांगतो. माझा स्वभाव लपवून ठेवण्याचा नाही. मिलिंद नार्वेकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे माहिती नाही असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. तसेच मी मुख्यमंत्री असल्यामुळे अनेकजण मला भेटण्यासाठी येत असतात, त्यांच्या कामानिमित्त ते माझी भेट घेत असतात परंतु त्यांच्याबाबत माझ्याकडे सध्या माहिती नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
 
म्हणुन मिलिंद नार्वेकरांची चर्चा सुरु झाली
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे संघर्ष निर्माण झाला आहे. तसेच दोन गट पडले आहेत. शिंदे यांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर गुजरातला गेले होते. यानंतर मिलिंद नार्वेकरसुद्धा शिवसेनेत फारसे सक्रिय नसल्याचे सांगितले जात आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतलं होते. याची माहिती गुप्त होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभेत बोलताना नार्वेकरसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले असल्याचे सांगितले. यानंतर मिलिंद नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती.

Edited - Ratandeep Ranshoor