सोमवार, 27 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (19:51 IST)

महाराष्ट्रात लॉक डाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

Chief Minister Uddhav Thackeray said about lockdown in Maharashtra
सध्या कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना (महाराष्ट्र कोरोनाव्हायरस) चे सर्वाधिक 47,827 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी 202 लोक मृत्युमुखी झाले आहेत. राज्यात नवीन संसर्गित रुग्णांचा आकडा 29,04,076 च्या वर गेला आहेत. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रकरणात विक्रमी वाढ झाल्याचे जाहीर केले. शुक्रवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "कोरोनातील परिस्थिती जर अशीच राहिली तर लॉकडाऊनची शक्यता नाकारता येणार नाही."आज संपूर्ण लॉकडाऊन चे संकेत देत आहे. लॉक डाऊन लावण्यात येत नाही. 2 दिवसातच मी चर्चा करून यावर निर्णय घेईन.  
शुक्रवारी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते की ही मोठी कोंडी आहे. जर आपण लॉकडाउनची अंमलबजावणी केली तर आर्थिक चाक थांबेल. जर आर्थिक चाक कार्यरत असेल तर आपल्या सामोरं कठीण परिस्थिती दिसत आहे. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान लघु व मध्यम उत्पन्न व्यवसायातील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आता पुष्कळ लोकांसाठी नवीन प्रमाणावर होईल. काही वेळा पूर्वी सिनेमा, रिटेल आणि शॉपिंग इंडस्ट्रीशी संबंधित संस्थांनी ठाकरे यांना महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करू नये अशी विनंती केली होती. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (एमएआय), रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) आणि शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले होते की ते सरकारच्या सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरणं करीत आहेत, जर लॉकडाउन लागू केले तर व्यवसाय कमी होईल
उद्धव यांच्या मते लॉकडाउन टाळायचे असेल तर हे नियम पाळावे लागतील. लॉकडाऊन केल्यास विपक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचे म्हणत आहे . या वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की रस्त्यावर यायचे आहे तर नक्की या परंतु कोरोनाशी लढा देण्यासाठी या. आरोग्य कामगारांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा. 
ठाकरे म्हणाले की सध्या कोरोनाची ही लाट एका वादळं प्रमाणे आहे आणि लस म्हणजे छत्री प्रमाणे आहे. ही छत्री म्हणजे लस घेतल्यावर आपण सुरक्षित राहणार. परंतु सध्या आपण एका वादळाचा सामना करीत आहोत. या साथीच्या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला प्रोटोकॉल चे पालन करावे लागणार. जसे की मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे.