बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (14:22 IST)

शाळेच्या फी अभावी मुलांना घरी पाठवले

school reopen
अवघ्या दोन वर्षांनंतर राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता तब्बल दोन वर्षानंतर मुलांनी शाळेत जाण्यास सुरुवात केली असून राज्यातील काही शाळा 15 जून पासून सुरु झाल्या आहेत. दोन वर्षानंतर मुले आणि  शाळेत जाण्यासाठी उत्सुक आहे. पण जर शाळेत जाऊन देखील विद्यार्थ्याला वर्गात न बसवता थेट घरी पाठवले जाते तेव्हा त्या मुलाच्या मनावर काय परिणाम होणार ?असेच काहीसे घडले आहे. ठाण्यात. ठाण्यातील वसंत विहार हायस्कुल मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आर्थिक परिस्थिती बिघडल्याने इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या काही मुलांच्या पालकांनी शाळेची फी वेळेवर भरली  नाही म्हणून त्या पालकांच्या मुलांना शाळा प्रशासनाने शाळेत पालकांना बोलावून शाळेतून घरी पाठवून दिले आहे. 
 
 कोरोनाच्या काळानंतर दोन वर्षांनी सर्व शाळा उघडल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर ठाण्याच्या वसंतविहार शाळेत पाच विद्याथ्यांना शाळेत बोलावले आणि त्यांना वर्गात बसू न देता मुख्याध्यापकांच्या कार्यालयाच्या बाहेर बसवून ठेवले. नंतर शाळा प्रशासनाने त्यांच्या पालकांना बोलावून आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. कोणतीही पूर्व सूचना न देता विद्यार्थ्यांना शाळेतून घरी पाठवल्याने संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपल्या मुलांना घरी घेऊन जा आणि फी भरल्यावरच शाळेत पाठवा असे मुख्याध्यापक म्हणाले. या बाबत एका विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. शाळेत मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे मुलांच्या मनावर परिणाम होण्याचे त्यांनी सांगितले.