रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2017 (17:13 IST)

शेट्ये यांच्या संशयास्पद मृत्यूची कायदेशीर चौकशी व्हावी - चित्रा वाघ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मंजुळा शेट्ये यांच्या संशयास्पद मृत्यूची कायदेशीर चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

मंजुळा शेट्येचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यातच आयजी स्वाती साठे यांच्याकडून आरोपी कैदींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे पुढे आले. या प्रकरणात कायदेशीर चौकशीची मागणी आम्ही पहिल्या दिवसापासून करत आहोत. आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी सुद्धा ही आग्रहाची मागणी केली. मंजुळा शेट्ये यांनी जेल प्रशासनाचा भ्रष्ट कारभार पुढे आणला आणि याची किंमत त्यांना जीवानीशी द्यावी लागली. या हत्येसाठी फक्त जेल प्रशासनच नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटीलसुद्धा जबाबदार आहेत, असा आरोप वाघ यांनी केला आहे.