शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:10 IST)

8 वी ते 12 वीचे वर्ग सोमवारपासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थित सुरु होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागातील शाळा सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पावणे दोन वर्षांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरु होणार आहेत. सोमवारपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी घेणे आवश्यक असून याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.
 
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कोरोनाची टेस्ट निगेटीव्ह असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या कर्मचा-यांनाच कामावर हजर करुन घ्यावे. प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याकरिता शाळेतील 100 टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे.
 
त्याचबरोबर सर्व शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरुन घेणे आवश्यक आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण, तापमान मोजणीसाठीची गण, डिजिटल थर्मामीटर, हात धुण्याची व्यवस्था, सुरक्षित अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.
 
महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या इयत्ता 8 वी ते 12 वीच्या शाळा सोमवारपासून सुरु होणार आहे. त्यासाठी काही अटी असणार आहेत. त्यात राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक, स्वच्छता विषयक सुविधा, जंतुनाशक साबण, पाण्याची उपलब्धतता, विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या बसचे निर्जंतुकीकरण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना कोरोनासाठीची 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळेत दप्तरी ठेवण्यात यावे.
 
शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. वर्गखोली, स्टाफरुममधील बैठकव्यवस्था सुरक्षित अंतराच्या नियमानुसार असावी. शाळेत दर्शनी भागावर मास्कचा वापराबाबत फलक लावावेत. सुरक्षित अंतर राखण्यासाठी विशिष्ट चिन्हे लावावीत. येण्या व जाण्याचे वेगवेळगळे मार्ग निश्चित करणा-या खुणा कराव्यात.
 
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन घ्यावी. शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोनवेळा निर्जंतुकीकरण केले जाते का याची खातरजमा शाळा व्यवस्थापनाने करावी असे आदेश देण्यात आले आहेत.