शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (10:01 IST)

महापोर्टल बंद करा नेहमीच्या पद्धतीने परीक्षा घ्या

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्त्यांचा आता संयमाचा बांध तुटू लागला आहे. लातूर येथे विद्यार्थ्यांनी एकत्र येत सरकार विरोधात आंदोलन केले आहे.  
 
महाभरती, मेगाभरती, महापोर्टल, सर्वांना रोजगार असे अनंत शब्द सतत ऐकून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्‍या या विद्यार्थ्यांनी तहसीलसमोर बसकन मारुन सगळा रस्ता जाम करुन टाकला. काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजू बंद होत्या. शेकडो वाहने ताटकळत होती. नंतर या विद्यार्थ्यांनी फक्त तहसीलचा मार्ग अडवून धरला. महापोर्टलद्वारे विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे, पैशाचे गैरव्यवहार होत आहेत, परिक्षेला हजर नसलेल्या विद्यार्थ्यांना चक्क उत्तीर्ण केले जात आहे. महापोर्टल बंद करा आणि परिक्षा नेहमीच्या पद्धतीने घ्या, ऑनलाईन परिक्षा बंद करा अशी मागणी हे विद्यार्थी करीत होते.