अमरावतीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसब्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. तर काही भागात दुचाकीही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
तर दुसऱ्या बाजूला अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल शेतमाल भिजला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. त्यामुळे आता पेरणी करायची कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय.