शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जून 2017 (17:35 IST)

विकासाठी इनोव्हेटिव्ह पद्धतीने पैसे उभे करू : मुख्यमंत्री

कर्जमाफीमुळे राज्याच्या  तिजोरीवर निश्चित भार येणार आहे.  आधीच राज्यात वित्तिय तूट आहे, ती भरून काढावी लागणार आहे. पण एकदा निर्णय घेतला की त्यातून मार्ग काढू. सध्या आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे, पण ती आम्ही शिवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.पुणतांब्याच्या संपात सहभागी झालेल्या 40 गावच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
 
आम्हाला सुरु असलेल्या विकास प्रकल्पांसाठीच कर्ज काढावं लागणार होतं, मात्र आता इनोव्हेटिव्ह पद्धतीने पैसे उभे करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या मनात होतं, त्यामुळेच कर्जमाफी केली. जर मनातच नसतं, तर कर्जमाफी नाकारण्यासाठी अनेक कारणं होती, पण आम्हाला कर्जमाफी करायची होती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.