मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2017 (11:18 IST)

निफाडला सर्वात कमी तापमानाची नोंद

cold in nashik

नाशिक जिल्ह्यातल्या निफाडचं तापमान आठ अंशापर्यंत खाली आलंय. उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे आता राज्यातला पाराही घसरू लागला आहे. महाबळेश्वरमध्ये पारा 8.8 अंशावर घरसलाय. उत्तर भारतात गेल्या आठवड्याभरात तापमान सातत्यानं कमी होत आहे. गेल्या काही दिवसात त्याचा परिणाम राज्यातही दिसू लागलंय. निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. इकडे नाशिकमध्येही किमान तापमान 8.2 अंश नोंदवण्यात आलय.