रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 6 ऑक्टोबर 2024 (13:19 IST)

काँग्रेसने शौचालयांवर कर लावला, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर घणाघात टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाण्यात एक सभेत बोलताना काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले,  
हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने मर्यादा ओलांडल्या आहेत. हिमाचलमधील काँग्रेस सरकारने शौचालय कर लावला आहे. एकीकडे मोदी शौचालये बांधा म्हणत आहेत आणि दुसरीकडे हिमाचल सरकार त्यावर कर लावत आहे. 

काँग्रेस पक्ष हे लूट आणि फसवणुकीचे पक्ष आहे.काँग्रेस हा भारतातील सर्वात अप्रामाणिक आणि भ्रष्ट पक्ष आहे.
गेल्या आठवड्यात जमीन घोटाळ्यात एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे नावं समोर आले. 
त्यांच्या एका मंत्र्याने महिलांना शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला. हरियाणामध्ये अमली पदार्थांसह काँग्रेस नेता पकडला. 

जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर अतिक्रमणावर विधेयक आणले आहे. मात्र तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी विरोध करण्याचे पाप काँग्रेसचे नेते  करत आहेत. काँग्रेसवाले वीर सावरकरांबद्दल चुकीचे बोलले तरी काँग्रेसचे नेते  त्यांच्या पाठीशी उभे राहतात.

कलम 370 बहाल करणार असे काँग्रेस म्हणत आहे, पण त्यांचे शिष्य यावर मौन बाळगून आहेत.
नव्या व्होटबँकेसाठी विचारधारेचा असा अध:पतन? ते म्हणाले की, आज प्रत्येक नागरिकाचे एकच ध्येय आहे - विकसित भारत.असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही व्यासपीठावर उपस्थित होते. 
Edited By - Priya Dixit