सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2017 (14:59 IST)

कॉंग्रेस कार्यालय फोडतोड : मनसेचे ८ कार्यकर्त्यांना कोठडी

मुंबई मध्ये सध्या फेरीवाला प्रश्नावर मनसे आक्रमक आहे. त्यामुळे मनसे विरोधात कॉंग्रेस असे चित्र पहायला मिळत आहे. या प्रकरणी मनसेने कॉंग्रेसचे आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या 8 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  
 
  या प्रकरणात तोडफोड केली तेव्हा गुन्ह्यातील बांबू, लोखंडी रॉड आणि मोटारसायकल जप्त करायची अजून बाकी असल्याचे सांगत पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली आहे. आज  शनिवारी दुपारी 1 वाजता किल्ला कोर्ट 37 वे न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एस. अराध्ये यांच्यासमोर हजर केले. होते. अजूनही फेरीवाला प्रश्न सुटला नसून मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे आता महापालिका आणि रेल्वेला आता कारवाई करणे गरजेचे झाले आहे. रेल्वे स्टेशन परिसरात मनसे कोणत्याही अनधिकृत फेरीवाल्यांना बसू देत नाही मात्र दुसरीकडे नागरिकांनी मात्र याचे स्वागत केले आहे.