बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जानेवारी 2026 (18:45 IST)

वादग्रस्त नगरसेवक तुषार आपटेचा राजीनामा

In Thane district
बदलापूरयेथे  लहान चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. 2024 साली बदलापूरच्या एका प्रसिद्ध शाळेतील स्वच्छताकर्मी अक्षय शिंदे याने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. या प्रकारणांनंतर बदलापूरकरांनी आंदोलन केले. रेल्वे रोको आंदोलन केले.
तसेच शाळेच्या सचिव तुषार आपटे यांच्यावर या प्रकरणात गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे बदलापूरकरांच्या रोषला सामोरी जावे लागले. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील सह-आरोपी आणि तत्कालीन शालेय सचिव तुषार आपटे यांची ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत भाजपने सह-नियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती केली.
 ALSO READ: अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम शिंदे शिवसेनेत सामील
भाजपने तुषार आपटे यांची  नगरसेवक म्हणून नियुक्ती केल्यामुळे विरोधक आणि सामान्य जनतेकडून भाजपला टीकेच्या सामोरी जावे लागले. ज्या मुळे पक्षाला बॅकफूटवर जावे लागले. 
वाढत्या विरोध आणि जनतेच्या मागणीनुसार, भाजपने तुषार आपटे यांना राजीनामा देण्याचे सांगितले आहे. त्यानुसार, तुषार आपटे यांनी राजीनामा दिला आहे. 
Edited By - Priya Dixit