Festival Posters
✕

नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे दीक्षांत संचलन संपन्न

Updated: शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (20:43 IST)
 
पोलीस महासंचालक रजनीश सेठ आपल्या मागर्दशनात म्हणाले, प्रशिक्षणार्थी आज आपले प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस सेवेत रूजू होणार आहेत. समाजातील वंचित व शोषित घटकास समान न्याय व संरक्षण देणे ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. अवैध वाळू उपसा, अंमली पदार्थ या सारख्या असामाजिक गुन्हेगारीवर आपला अंकुश असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नागरिकांप्रती आपली वर्तणूक सद्भावपूर्ण असावी. गुन्ह्याचा तपास कायद्याला अभिप्रेत असलेल्या प्रक्रियेनुसार होणे अपेक्षित आहे. असे पोलीस महासंचाल त्यांनी सांगितले.
 
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 122 (सरळ सेवा) चे प्रशिक्षण सत्र हे 1 ऑगस्ट, 2022 पासुन सुरु झाले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून निवड झालेल्या349 पुरुष व 145 महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश असुन 1 प्रशिक्षणार्थी गोवा राज्याचे आहेत. एकुण 494 पोलीस उपनिरीक्षक यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणार्थी पैकी 88% प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व 12% पदव्युत्तर आहेत, यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी अहवाल वाचनात दिली.
 
या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, नाशिक महानगपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थींचे कुटुंबिय मोठ्या संख्याने उपस्थित होते. 
 
दीक्षांत संचलनात उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले कॅडेट...
▪️ अभिजीत भरत काळे: यशवंतराव चव्हाण गोल्ड कप - ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच
▪️ रेणुका देवीदास परदेशी : अहिल्याबाई होळकर कप - ऑल राऊंड वूमन कॅडेट ऑफ द बॅच
▪️ रुबिया ताजुद्दिन मुलाणी : बेस्ट कॅडेट इन ड्रिल
▪️ प्रशांत हिरामण बोरसे : "एन.एम. कामठे गोल्ड कप" बेस्ट कॅडेट इन राफल अँड रिव्हॉल्वर शूटिंग
▪️ अभिजीत भरत काळे : रिव्हॉल्वर ऑफ हॉनर - बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
▪️ किरण सुभाष देवरे : डॉ. बी. आर. आंबेडकर कप - बेस्ट कॅडेट इन लॉ
▪️ किरण सुभाष देवरे : सिल्व्हर बॅटन - बेस्ट कॅडेट इन स्टडीज
▪️ किरण सुभाष देवरे : सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच 
 
दीक्षांत संचालन समारंभानंतर नूतन शैक्षणिक संकुल, मोटर परिवहन विभाग इमारत, अकॅडमी मुख्य प्रवेशद्वार व संरक्षक भिंत कोनशिलेचे अनावरण आणि भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ.राहूल आहेर, राहुल ढिकले, पोलीस महासंचालक रजनिश सेठ, अपर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर व अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
 
असे आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे नूतन शैक्षणिक संकुल....
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई अंतर्गत 13 हजार 846 चौरस मीटर जागेत 79 कोटी 68 लाख 61 हजार 908 रुपयांचे नवीन शैक्षणिक संकुल व इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 26 वर्ग खोल्या, 1 सायबर लॅब, 1 संगणक लॅब, 1 स्टाफ रूम, 1 कॉन्फरन्स हॉल असणार आहे. तसेच मोटर परिवहन विभाग इमारत, प्रवेशद्वार, टेहाळणी टॉवर, संरक्षक भिंत याप्रमाणे इतर पायाभूत सुविधा या शैक्षणिक संकुलात उपलब्ध होणार आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महाराष्ट्राच्या ऊसदराचा कर्नाटकला फटका; सीमाभागातील ऊस महाराष्ट्राकडे

पैशांसाठी माणुसकी मेली; ४ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करून अवयव काढले, ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न

पुण्यातील D-Mart गोदामावर FDAची कारवाई: ५० लाख रुपये किमतीचे २०,००० लिटरहून अधिक खाद्यतेल जप्त

LIVE: पुण्यातील D-Mart गोदामावर FDAची कारवाई: ५० लाख रुपये किमतीचे २०,००० लिटरहून अधिक खाद्यतेल जप्त

सिंगल चार्जमध्ये ४०० किमीपर्यंत धावणाऱ्या भारतातील ५ दमदार इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि टॉप स्पीड

पुढील लेख
Show comments