रविवार, 14 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (21:03 IST)

कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे टेस्टिंगचे प्रमाण वाढवणार : टोपे

Health Minister Rajesh Tope has given such instructions to the collector
मुंबई, पुणे, अमरावती, रत्नागिरी या भागात कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. तसेच खास करून विदर्भात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कोरोना संदर्भातील अनेक सूचना देण्यात आल्या. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे टेस्टिंगचे प्रमाण वाढले पाहिजे, अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कलेक्टर, कमिशनर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली आहे.
 
राजेश टोपे म्हणाले की, ‘विदर्भात कोरोनाचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे थ्री टी प्रिंसिपलचे पालन करणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची वाढ होत असेल त्या ठिकाणी ट्रॅकिंग करणे म्हणजेच एक केस असेल तर त्यासंदर्भात १० ते १५ लोकांचे ट्रॅकिंग करणे, ट्रेसिंग करणे आणि ट्रिटमेंट करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे हलगर्जीपणा होत आहे, आळस केला जात आहे. त्यामुळे असे करून चालणार नाही.’ याच पार्श्वभूमीवर टोपे यांनी राज्यातील कलेक्टर, कमिशनर आणि आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच ज्या ठिकाणी कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढत आहेत, तिथे टेस्टिंगचे प्रमाण वाढले पाहिजे, अशी महत्त्वाची सूचना देण्यात आली.