नागपुरात लग्नाचा वाढदिवस साजरा करून जोडप्याची आत्महत्या
Nagpur News: नागपुरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाचा वाढदिवस नातेवाईकांसोबत साजरा करून एका जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घरातून सुसाईड नोट आणि व्हिडिओ सापडला आहे. यामुळे अनेक खुलासे झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लग्नाचा वाढदिवस नातेवाईकांसोबत साजरा केल्यानंतर एका जोडप्याने गळफास लावून घेतला. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या अनेक वर्षानंतरही या जोडप्याला मूल झाले नाही आणि दोघेही काही वर्षांपासून बेरोजगारीमुळे त्रस्त होते. यामुळे त्यांनी हे आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. मंगळवारी पोलिसांनी नागपूरच्या पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तसेच या दांपत्याचा लग्नाचा 28 वा वाढदिवस होता. जवळपास दोन दिवस सोमवार आणि मंगळवारी मध्यरात्री वाढदिवस आनंदात साजरा केला. या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व नातेवाईक आणि परिचितांना बोलावण्यात आले. तसेच लग्नाला अनेक वर्षे उलटूनही अपत्यप्राप्तीचे सुख न मिळाल्याने दोघेही दुखावल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले.
तसेच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य आर्थिक संकटाशी झुंजत होते. त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच तपासादरम्यान पोलिसांना घरातून सुसाईड नोट आणि व्हिडिओ जप्त करण्यात आला आहे.