1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जून 2023 (15:53 IST)

कोव्हिड फील्ड हॉस्पिटल घोटाळा प्रकरण

kishori pednekar
मुंबई 
कथित कोव्हिड फील्ड हॉस्पिटल घोटाळा प्रकरणात मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर संशयाच्या घेऱ्यात आहेत. कोरोना काळात मृतांसाठी असलेल्या बॅग्स खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर आता पहिल्यांदाच किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना आपली बाजू स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
 
नेमंक काय म्हणाल्या पेडणेकर? 
कोव्हिड काळात मृतदेहांसाठी खरेदी करण्यात आलेल्या बॅगांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप माझ्यावर करण्यात येत आहे. मात्र तुम्ही सत्यता पडताळनी केली आहे का असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळात आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचं काम केलं. कोरोना काळात कोव्हिड सेंटर उभारण्याचं काम 14 दिवसांत पूर्ण झालं. आम्ही सर्व नियमांचं पालन केलं.  टेंडर काढले, कोटेशन काढले सगळं केलं. ही सगळी कंत्राट स्थायी समितीमध्ये पास होतात. त्यामध्ये सर्व पक्षाचे लोक असतात. आता ही सर्व जबाबदारी झटकून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर आरोप सुरू असल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.