शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2017 (20:39 IST)

पित्याकडूनच तरुणी हत्येचा कट, दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला

अमरावतीतील तरुणीने दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम केले म्हणून जन्मदात्या पित्यानेच  19 वर्षांच्या तरुणी हत्येचा कट रचला.  तिचे दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला आहे. यात मामा आणि वडिलांनी तिला चिखलदऱ्याच्या डोंगरातून दरीत ढकलून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काळ आला होता पण वेळ नाही असेच म्हणावे लागले कारण खोल दरीत पडताना ही तरुणी झाडाला अडकल्यामुळे बचावली. दरम्यान, गस्तीवर असलेल्या वनरक्षकाने तिला पाहिले. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तरुणीच्या वडील आणि मामास ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.