गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (12:04 IST)

जळगावात संचारबंदी उठवली, शांततेचे वातावरण

Curfew lifted in Paladhi village
जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणांवरून हाणामारी झाली. त्यामुळे हिंसाचार उसळला. दुकाने जाळण्यात आली. दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात संचारबंदी लागू केली. पोलिसांनी आता शांततेचे वातावरण झाल्यानंतर जळगावातील संचारबंदी उठवली आहे. 

एसपी महेश्वर रेड्डी यांनी एएनआयला सांगतिले की 31 डिसेम्बर 2024 रोजी रात्री 11 वाजता पाळधी गावात रोडरेंजची घटना घडली. या वेळी सुमारे 100 ते 150 लोकांचा जमाव झाला.नंतर हाणामारी झाली आणि वातावरण बिघडले. काही लोकांनी दगडफेक केली आणि दुकाने पेटवली. तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून शांतता स्थापित केली. 
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या संदर्भात दोन एफआयआर निंदवले आहे. त्याच दिवशी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणी नंतर आणखी आठ जणांची ओळख पटवली असून ते पसार झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. गावकऱ्यांशी संपर्क साधलांनंतर त्यांनी अशी घटना पुन्हा घडू नये असे मान्य केले आहे. भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 163 अंतर्गत निर्बंध हटवण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit