1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. currency from black listed comapny

नारा मेक इन इंडिया, नोटा छपाई परदेशी कंपनीला

नारा मेक इन इंडिया
एका बाजूला मेक इन इंडिया असे म्हणायचे आणि देशातील काम परदेशी कंपनीला द्यायचे असा काहीसा प्रकार घडतो आहे.नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर  नव्या नोटांची छपाई करण्यासाठी इंग्लंडच्या ‘डे लारु’ या कंपनीला कंत्राट देण्यात आले. नोटा छपाईसाठी दिलेली कंपनी ही ब्लॅक लिस्टेड कंपनी असल्याचे समोर  आले आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी देशभरात ‘मेक इन इंडिया’चा गाजावाजा करत आहेत. इंग्लंडमध्ये ‘डे लारु’ या कंपनीचे मुख्यालय आहे. या कंपनीला नव्या नोटा छपाईचे कंत्राट दिल्याने नाशिकच्या सिक्युरिटी प्रेस कर्मचाऱयांचाही विरोध केला आहे. यातच नव्या नोटांच्या छपाईचे कंत्राट ब्लॅकलिस्टेड परदेशी कंपन्यांना दिल्याने पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’च्या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.त्यामुळे आता केंद्र सरकार काय भूमिका घेते की निर्णय कायम ठेवते या कडे सर्वांचे लक्ष आहे.
पुढील लेख
अल्पवयीन पत्नीशी शारिरीक सबंध हा गुन्हा: सुप्रीम कोर्ट