गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2023 (23:41 IST)

बिपरजॉय चक्रीवादळ : मुंबईत जोरदार लाटा, वेगवान वारा आणि पावसाचीही शक्यता

Cyclone Biparjoy
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळाने गुजरातमधील प्रशासनासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण केली आहे. विशेषतः किनारपट्टीवरील भागांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
बिपरजॉय हे गुजरातच्या दिशेने सरकत असलं तरी त्याचा प्रभाव मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसून येत आहे. मुंबईच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या असून वेगाने त्या किनाऱ्याला धडकत आहेत.
 
अरबी समुद्रात घोंगावणारं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्याकडे सरकतंय. पण त्याचा प्रभाव मुंबई आणि कोकणातही जाणवतो आहे. या परिसरात चक्रीवादळामुळे वेगवान वारा आणि पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
 
भारतीय हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अपडेटनुसार बुधवारी दुपारी 2.30 वाजता अतितीव्र चक्रीवादळ बिपरजॉय हे देवभूमी द्वारकेपासून 270 किलोमीटर अंतरावर, तर कच्छमधील जखाऊ बंदरापासून 260 किलोमीटर अंतरावर पोहोचलं होतं.
 
गुजरातच्या कच्छ परिसरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
बिपरजॉय हे वायव्य दिशेकडे सरकत आहे. 15 जूनला बिपरजॉय जखाऊ बंदर आणि मांडवीजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे वादळ किनारपट्टीला पोहोचताना वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटर असण्याचा अंदाज आहे.
 
गुजरात सरकार आणि स्थानिक प्रशासनाने वादळाची तीव्रता लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा दिला असून खबरदारी म्हणून आवश्यक ते उपाय केले जात आहेत.
 
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील अधिकारी आणि मंत्र्यांसोबत एक व्हर्चुअल बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
 
सौराष्ट्र आणि कच्छमधील किनारपट्टीच्या भागांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
तस तर उत्तर हिंदी महासागर क्षेत्रात एरवी साधारणपणे उन्हाळ्याच्या अखेरीस बंगालच्या उपसागरात पहिल्यांदा चक्रीवादळं तयार होताना दिसणं नवं नाही. पण 2019 पासून अरबी समुद्रात उठणाऱ्या चक्रीवादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता वाढताना दिसली आहे.
 
2020 साली 'निसर्ग' आणि 2021 साली 'तौक्ते' अशी सलग दोन वर्ष कोकणाला मान्सूनआधीच चक्रीवादळाचा तडाखा बसला. या दोन्ही वादळांचा प्रभाव किनाऱ्यापासून दूरवरच्या भागातही दिसून आला आहे.
 
तसं तर उत्तर हिंदी महासागर क्षेत्रात एरवी साधारणपणे उन्हाळ्याच्या अखेरीस बंगालच्या उपसागरात पहिल्यांदा चक्रीवादळं तयार होताना दिसणं नवं नाही. पण 2019 पासून अरबी समुद्रात उठणाऱ्या चक्रीवादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता वाढताना दिसली आहे.
 
2020 साली 'निसर्ग' आणि 2021 साली 'तौक्ते' अशी सलग दोन वर्ष कोकणाला मान्सूनआधीच चक्रीवादळाचा तडाखा बसला. या दोन्ही वादळांचा प्रभाव किनाऱ्यापासून दूरवरच्या भागातही दिसून आला आहे.
 
पण अरबी समुद्र खरंच एवढा खवळतो आहे का? यामागे काय कारणं असावीत? जाणून घ्याअरबी समुद्रात घोंगावणारं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्याकडे सरकतंय. पण त्याचा प्रभाव मुंबई आणि कोकणातही जाणवतो आहे. या परिसरात चक्रीवादळामुळे वेगवान वारा आणि पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
 
अरबी समुद्रात वाढती चक्रीवादळं
चक्रीवादळाची निर्मिती दोन गोष्टींवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचं विशेषतः पृष्ठभागाचं तापमान आणि वाऱ्यांची दिशा.
 
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बीबीसी मराठीचा हा व्हीडियो पाहू शकता.
 
पण थोडक्यात सांगायचं, तर पाण्याच्या वरच्या भागाचं तापमान वाढलं, की त्याची वाफ होऊन ती वर सरकते. त्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. मग आसपासच्या वातावरणातली थंड हवा या दिशेनं चक्राकार वाहू लागते.
 
भारतीय उपखंडाचा विचार केला, तर बंगालचा उपसागर अनेक ठिकाणी उथळ आहे. "बंगालच्या उपसागरात पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान जास्त असतं. तो गरम समुद्र आहे. त्यामुळे तिथे अतिशय शक्तिशाली चक्रीवादळं येतात," असं भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्रा सांगतात.
 
अरबी सुमद्र तुलनेनं खोल असून, त्यातलं पाणी तुलनेने थंड आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रात कमी चक्रीवादळं जन्माला येतात आणि त्यांची तीव्रता कमी असते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
पण गेल्या तीन-चार वर्षांत हे चित्र बदलेलं दिसलं आहे.
 
गेल्या तीन वर्षांत अरबी समुद्रात तयार झालेलं तौक्ते हे अकरावं चक्रीवादळ ठरलं आहे. तसंच ते गेल्या तीन वर्षांत अरबी समुद्रात तयार झालेलं दुसरं अत्यंत तीव्र चक्रीवादळ (extremely severe cyclonic storm) ठरलं आहे.
 
2018 साली सागर, मेकानू, लुबान ही तीन चक्रीवादळं अरबी समुद्रात तयार झाली होती. पण तिन्ही वादळं पश्चिमेला येमेन आणि ओमानच्या दिशेनं वळली होती.
 
2019 साली अरबी समुद्रात वादळांचा विक्रम रचला गेला, आणि एकाच मोसमात इथे वायू, हिक्का, क्यार, माहा, पवन या पाच चक्रीवादळांची नोंद झाली. त्यातली दोन चक्रीवादळं, म्हणजे वायू आणि माहा उत्तरेला म्हणजे गुजरात-पाकिस्तानच्या प्रदेशात सरकली होती.
 
2020 साली जूनच्या सुरुवातीला निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन-दिवेआगरच्या किनाऱ्यावर येऊन थडकलं. तर नोव्हेंबरमध्ये गती हे चक्रीवादळ सोमालियाला जाऊन धडकलं.
 
निसर्गनंतर वर्षभरातच तौक्ते चक्रीवादळानं कोकण किनाऱ्याला झोडपून काढलं आहे.
 
अरबी समुद्र का खवळला आहे?
अरबी समुद्रातल्या या वाढत्या चक्रीवादळांनी जगाचंही लक्ष वेधून घेतलं आहे. तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्राचं तापमान वाढत आहे, आणि त्यामुळेच तिथे चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता वाढते आहे.
 
2019 साली भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेल्या अहवालानुसार अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. 1981-2010 च्या तुलनेत गेल्या 2019 साली अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 0.36 अंश सेल्सियसनं वाढल्याचं हा अहवाल सांगतो.
 
चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी एरवी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 27 अंश सेल्सियस एवढं असावं लागतं. निसर्ग चक्रीवादळ आलं, तेव्हा अरबी समुद्रात हे तापमान 32 अंशांपर्यंत गेलं होतं, असं हवामान विभागाचे रेकॉर्ड्स सांगतात.
 
खरं तर हवामान बदलांमुळे जगभरातच वादळांची संख्या आणि स्वरुप बदलत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इथे एक विरोधाभासही आहे.
 
चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान जास्त असावं लागतं. पण जागतिक तापमानवाढीमुळे संपूर्ण समुद्राचं तापमानच वाढत आहे. तसंच काही ठिकाणी वितळेल्या हिमनद्या समुद्रात मिसळत असल्यानं पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान कमी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे चक्रीवादळांची संख्या कमी होऊ शकते, असं काही शास्त्रज्ञांना वाटतं.
 
उदाहरणार्थ एकीकडे अरबी समुद्राचं तापमान वाढत असताना, बंगालच्या उपसागरात पृष्ठभागावरचं तापमान कमी होऊ शकतं. त्यामुळेच बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रात वादळांची तीव्रता वाढू शकते.
 
जपानमधले संशोधक एच. मुराकामी, एम. सुगी आणि ए. किटोह यांनी 2012 सालच्या शोधनिबंधात म्हटलं आहे, की अरबी समुद्रात चक्रीवादळांची वारंवारता 46 टक्के इतकी वाढेल, तर बंगालच्या उपसागरमध्ये ही वारंवारिता 31 टक्क्यांनी कमी होईल.
 
भवताल मासिकाचे संपादक आणि पर्यावरण अभ्यासक अभिजीत घोरपडे सांगतात, की "येत्या काळात नेमकं कसं चित्र असेल याचं निश्चित भाकित केवळ तीन वर्षांच्या परिस्थितीकडे पाहून करणं योग्य ठरणार नाही. पण अरबी समुद्रात चक्रीवादळांचं स्वरूप बदलतं आहे हे लक्षात ठेवून पुढची पावलं उचलायला हवीत."
 
चक्रीवादळांच्या वाढत्या तीव्रतेविषयी मात्र शास्त्रज्ञांमध्ये अजिबात दुमत दिसत नाही.
 
मुंबई आणि कोकणाला धोका वाढला?
अरबी समुद्रात चक्रीवादळ आलं तरी ते थेट मुंबईवर येऊन धडकण्याची शक्यता फार कमी असते.
 
"उत्तर गोलार्धातले विषुववृत्तीय वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजेच मुंबईकडून समुद्राकडे वाहतात. त्यामुळे आलेलं चक्रीवादळ पुढे सरकून गुजरातच्या किनारपट्टीवर आदळतं. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली तरी अशी वादळं मुंबईपासून अनेकदा दूर जातात," असं अभिजीत घोरपडे सांगतात.
 
पृथ्वीवरच्या कुठल्याही समुद्रातील वादळांचा विचार केला, तर साधारण हेच चित्र दिसतं. पण अरबी समुद्रातलं वादळ मुंबईवर थेट आदळलं नाही, तरी मुंबईत आणि कोकणात मोठं नुकसान करू शकतं, हे 2009 साली फयान आणि यंदा तौक्ते या चक्रीवादळांनी दाखवून दिलं आहे.
 
सागरी उधाण आणि जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे या शतकभरात मुंबईत समुद्राची पातळी 1.8 मीटर इतकी वाढेल, असाही संशोधकांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कमी तीव्रतेचं चक्रीवादळही शहरात आणि कोकण किनारपट्टीवर मोठं नुकसान करू शकतं.
 
पर्यावरणाविषयी व्यापक लिखाण करणारे लेखक आणि कादंबरीकार अमिताव घोष बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आठवण करून देतात की, "1998 ते 2001 या कालावधीत तीन चक्रीवादळं भारतीय उपखंडात आली होती आणि त्यात 17,000 जणांचा जीव गेला होता."
 
त्यानंतरच्या वीस वर्षांत हवामान विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे आता मोठी वादळं येऊनही तुलनेनं नुकासन कमी होताना दिसतं. पण थेट मुंबईला एखादं वादळ येऊन धडकलं, तर मोठं नुकसान होण्याची भीती कायम आहे.
 



Published By- Priya Dixit