शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (14:54 IST)

राज्यातील १४ पूल अत्यंत धोकादायक

    • देशातील अनेक पूल धोका दायक आहेत. असे केंद्रीय मंत्री यांनी सांगितले.त्यापैकी १४ पूल महाराष्ट्रात असून ते कधीही पडू शकतात असा अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये सांगली जवळील पेठ, भोसे आणि लांगडेवाडी या पुलांचा समावेश आहे. पुण्याजवळील वर्वे तर उस्मानाबादमधील अलीयाबाद या पुलांचाही यात समावेश आहे. पेठ (सांगली), भोसे (सांगली),लांडगेवाडी (सांगली),मिरज गावातील पूल (सांगली),वर्वे खुर्द (पुणे),मुळा नदीवरील पूल (पुणे),आलियाबाद पूल (उस्मानाबाद),बोरामणी (सोलापूर),काळसेनगरचा पूल (सोलापूर),भीमानदीवरचा पूल (सोलापूर),पंचगंगा नदीवरील पूल (कोल्हापूर),शिवणा नदीवरील पूल (औरंगाबाद),असना नदीवरील पूल (नांदेड),पांगरी पूल (नांदेड) असे पुलांची नवे आहेत. यामध्ये सर्वाधील पुल ४ हे सांगली येथील आहे.त्यानंतर सोलापूर येथील असलेले जवळपास तीन पूल हे धोकादायक आहेत. मोठी घटना घडण्या आगोदर राज्यसरकारने यावर कारवाई करणे गरजेचे आहे. किमान ते दुरुस्थ तर झाले पाहिजे.