शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जून 2017 (14:21 IST)

धोकादायक विजेची तार

द्वारका नाशिक येथील रस्त्याच्या मधोमध जो पथदीप आहे तो बऱ्याच दिवसापासून तुटलेल्या अवस्थेत आहे व तो तसाच दुभाजका वर तसाच पडून असून शेजारील पथदीप वरून येणारी विजेची तार ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या जाळीस बांधलेली आहे.

अशात मोठी दुर्घटना घडु शकते शिवाय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे शहर विभाग क्रमांक 1 चे कार्यालय सुद्धा शेजारीच आहे व यातील बरेचसे कर्मचारी सुद्धा येथूनच रस्ता ओलांडत असतात ही सुरक्षिततेची बाब त्यांच्याही लक्षात यावयास हवी होती.

 सतीश दाभाडे