शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 मे 2022 (15:47 IST)

मामाच्या लग्नात भाच्याचा मृत्यू

death
काळ कधी कुठे आणि कोणावर झडप घालणार हे कोणालाच माहित नाही. लग्नाच्या वरातीत एका मुलावर काळाने झडप घातली आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरच्या खापा गावात घडली आहे. 
लग्न होण्याच्या आनंदात नवरदेव होता.लग्न मंडपात जाण्यापूर्वी नवरदेवाची वरात घोड्यावरून निघाली. वऱ्हाडी आणि सर्व जण आनंदात बँडच्या तालावर नाचत होते आणि अचानक नवरदेव ज्या घोड्यावर स्वार होता तो घोडा बिथरला आणि त्याने उंच होऊन लाथ उडवली. घोड्याची लाथ नवरदेवाच्या भाच्याला लागली आणि तो जखमी होऊन त्याचा दुर्देवी अंत झाला. हशमेल सलमान शेख असे या मयत मुलाचे नाव असून तो शिवा सावंगा येथून आपल्या मामाच्या लग्नासाठी आई-वडिलांसह खापा येथे आला होता. सकाळपासूनच लगीनघाई सुरु होती. लग्नघटिका जवळ येत असल्याने सर्व आनंदात होते.घोड्यावर नवरदेवाची वरात निघाली सोबत बॅण्ड होता.बँडच्या तालावर सर्व नाचत होते. बँडच्या तालावर घोडाही नाचू लागला.अचानक वस्तीतील एकाने नवरदेवावरून ओवाळणी करून दहा रुपयांच्या नोटांची उधळण केली. 

ओवाळणीतील नोटा उचलण्यासाठी हमशेल घोड्यामागे गेला. त्याच वेळी घोडा बिथरला आणि त्याने हमशेलला लाथ मारली. बेसावध असलेला हमशेल दगडावर जाऊन आदळला आणि गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले नंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला सावनेरच्या जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे अंतरक्तस्राव झाल्यामुळे त्याची प्राण ज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.हमशेलच्या मृत्यूची माहिती मिळतातच खापा गावात शोककळा पसरली आहे.