1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (16:07 IST)

देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आजच होण्याची शक्यता

उद्धव ठाकरे यांनी काल (29 जून) राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात, हे आता निश्चित आहे. इतकंच नाही तर आजच (30 जून) त्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हेसुद्धा आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. तिथे दोघांची चर्चा होईल आणि मग ते राज्यपालांची भेट घेतील.
 
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचाही शपथविधी आज होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.