शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 9 डिसेंबर 2024 (17:38 IST)

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

devendra fadnavis
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सोमवारच्या अधिवेशनात महायुती सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.या विशेष अधिवेशनात राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली विश्वासदर्शक ठरावाची निवड केली.  उदय सामंत यांनी महाआघाडीच्या सरकार विरोधात  विश्वासदर्शक ठराव मांडला. 

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला.
आवाजी मतदानाने विश्वासदर्शक मंजूर करण्याची माहिती मिळाली आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक ठराव विधिमंडळात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.येत्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर विधानसभेने पूर्ण विश्वास व्यक्त केला, असा एक ओळीचा प्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभेत आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. यादरम्यान अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी 8 आमदारांनी शपथ घेतली.महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे आज राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे.
  Edited By - Priya Dixit