देवेंद्र फडणवीसांना मुस्लिम महिलांनी बांधल्या राख्या!
मुंबई : रक्षाबंधन असल्याने प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. तर बहिणीला वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट भावाकडून दिले जात असते. बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा हा सण मानला जातो. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घेतली आहे.
ते आधी राज्याचे मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत, मात्र आपला शिरस्ता त्यांनी चुकवलेला नाही आणि ते समाजासाठी चांगले काम करत आहेत. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी चांगले काम केले, असे मत मुस्लिम महिलांनी राखी बांधल्यानंतर व्यक्त केले आहे. भाई हैदर आझम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज त्यांना राखी बांधण्यासाठी आलो आहोत असेही या महिला माध्यमांना बोलताना म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळीसुद्धा आम्ही त्यांना राखी बांधण्यासाठी येत होतो आणि ते आता उपमुख्यमंत्री आहेत तरीसुद्धा आम्ही राखी बांधायला आलोय.