1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पिंगळे विरोधात उच्चन्यायालयात आरोपपत्र दाखल

नाशिक- कर्मचारी वेतनवाढ रकमेच्या अपहार केल्या प्रकरणी माजी खासदार राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हाय कोर्टात विशेष न्यायालयात आरोपपत्र अर्थात चार्जशीट दाखल केली आहे. या आगोदर उच्च न्यायालयाने पिंगळेचा जामीन नाकारला होता.
 
म्हसरुल पो स्टे सी आर 210/16 कलम 7,13(1)अ ,ड ई,,13(2) भ्र प्र कायदा सह 109 आय पी सी या गुन्हयात आरोपी देविदास आनंदराव पिंगळे यांचे विरुद्ध आज हायकोर्ट मुंबई यांचे आदेश मिळवून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे,ते दोषारोप पत्र 1500 पानांचे दाखल केले आहे. Hi इतर आरोपींचे उच्च न्यायालयात याचिका 4159/16 प्रलमबीत असल्याने  व त्यांची सक्षम अधिकायांची मंजुरी बाकी असल्याने  पुढील आदेश झाल्यावर आरोप पात्र दाखल करण्यात येणार आहे.
 
विशेष कोर्टात आज एसीबी ने आरोपपत्र दाखल केले.यामध्ये त्यांनी आरोप निश्चित केले असून, लोकसेवक पदावर असताना पैसे , पदाचा गैर वापर करणे   फसवणूक करणे असे आरोप दाखल केले आहेत.
 
यामध्ये नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या रकमेपैकी 57.73 लाख रुपयांच्या रकमेविषयी  सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी खासदार देविदास पिंगळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशी केल्यावर अटक करण्यात आली होती.