बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (11:20 IST)

सर्वसामान्य कार्यकर्ता गोकुळचा संचालक

वर्षाकाठी एकूण १२० कोटींची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचा संचालक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि मानाचे पद समजले जाते. या पदासाठी तेवढ्यात ताकदच्या व्यक्तीची वर्णी लागते. बयाजी शेळके यांच्या रुपाने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता गोकुळच्या संचालक पदापर्यंत गेला आहे. 
 
पालकमंत्री सतेज पाटील यांनी शेळकेंना तिकीट दिले होते. बहुप्रतीक्षित गोकुळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता येणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 
 
विरोधी आघाडीतून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या पॅनलची घोडदौड सुरु असल्याची माहिती मिळते.
 
गोकुळ निवडणुकीसाठी रविवारी झाले होते मतदान : गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के इतके झाले होते. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक  यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
 
सतेज पाटील यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे तीन उमेदवार विजयी
सुजीत मिणचेकर – 346 मतांनी विजयी
अमर पाटील – 436 मतांनी विजयी
बयाजी शेळके – 239 मतांनी विजयी