विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर होम क्वारंटाईन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागातील पाच जिल्ह्यांचे प्रशासकीय पातळीवर नियोजन करणारे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर सध्या होम क्वारंटाईन आहेत. म्हैसेकर यांच्या वाहन चालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले असून त्यांच्या चाचणीचा अहवाल येईपर्यंत ते घरातून कामकाज पाहणार आहेत.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या वाहन चालकाची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैसेकर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी दररोज बैठका घेणे. घटनास्थळी पाहणी करणे. मंत्र्यांच्या दौऱ्यांना उपस्थित राहणे यासारखी कामे करत आहेत.