रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (15:00 IST)

जिल्हा परिषद आता आमच्या हाती येणार - दिवाकर रावते

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढत आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं ३९ उमेदवार दिले आहेत. जिल्ह्यातील मतदारांचा प्रतिसाद पाहता शिवसेनेलाच यश मिळेल. आमचा अध्यक्ष जरी झाला नाही तरी जो कुणी अध्यक्ष होईल त्याच्या चाव्या शिवसेनेच्याच हाती असतील असा विश्वास परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला. ते आज लातुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 
लातूर जिल्ह्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात फिक्सिंग झाल्याचा आरोप काल मुख्यमंत्र्यांनी केला होता. अशा फिक्सिंगच्या शक्यतेचा रावते यांनी इन्कार केला. आम्ही लातूर जिल्ह्यात ३९ उमेदवार उभे केले, इतर ठिकाणी आम्ही कुणाशी छुपी युती केली असा याचा अर्थ होत नाही.