गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2017 (17:01 IST)

कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार

कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना खरीपाच्या बी-बियाण्यांसाठी अडचण येऊ नये, यासाठी कर्जमाफी होईपर्यंत 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. कर्जमाफीचा निर्णय झाला आहे. ती 8 दिवसात व्हावी, अशी अपेक्षा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव कॅबिनेटच्या बैठकीत मांडला. मात्र ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार रुपये बी-बियाण्यांसाठी द्यावे. ते नंतर कापून घ्यावे, मात्र आता तातडीने मदत मिळावी म्हणून हे 10 हजार द्यावेत, अशी मागणी केली, त्याला मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.