मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (16:34 IST)

सरकारकडून दिवाळी धान्य किट

यंदाची दिवाळी सर्व सामान्यांची गोड जावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांना दिवाळी उत्सव किट (Diwali utsav kit)साखर, रवा, पाम तेल आणि चनाडाळ फक्त रु.100 मध्ये उपलब्ध करून दिली जाईल. अंबरनाथ विधानसभा मतदार संघातील लाभार्थ्यांना हे "दिवाळी उत्सव किट" उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ व उल्हासनगर शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. या बैठकीत अंबरनाथ शिधावत अधिकारी शशिकांत पाटसुळे, उल्हासनगर शिधावत अधिकारी पंडित राठोड, निरीक्षक संतोष मोरे, युसूफ शेख, पांडुरंग रानडे, निसार खान आदी उपस्थित होते.
Edited by : Smita Joshi