रविवार, 11 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 ऑक्टोबर 2016 (09:43 IST)

साई मंदिरात दिवाळी साजरी

diwali in shirdi
दिवाळीच्या सणामध्ये नेहमी प्रमाणे अनेक भक्तांनी साईबाबांची शिर्डीतही दिवाळी साजरी केली आहे. या उत्सवासाठी साईभक्त लाखो भाविक शिर्डीत आले होते. एक दंत कथा आहे की साईबाबा हयात असताना एका दिवाळीत त्यांनी पाण्यानं दिवे प्रज्वलित केल्याची केले होते.यामुळे हे सर्व भक्त एकत्र अख्यायिकेनुसार बाबांची शिर्डी दिवाळीच्या काळात लखलखत्या दिव्यांनी सजवली जाते. त्यासाठी साईमंदिर परिसरात भाविक दिवे लावून अवघा परिसर सजवून टाकतात. 

अनेक वर्षापासून ही प्रथा शिर्डीत सुरु असून आपल्यात असणारे दुर्गुण निघून जावो या साठी भाविक या ठिकाणी येऊन दिवे लागत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. मंदिर विभागाने सर्व भक्तांचे योग्य असे सुख सुविधा नियोजन केले होते.