गुडफ्रायडेला घरीच प्रार्थना, स्मरण करुन भगवान येशूंची शिकवण आचरणात आणा -अजित पवार  
					
										
                                       
                  
                  				  कोरानाचं संकट लक्षात घेऊन गुडफ्रायडेला घराबाहेर न पडता, घरीच प्रार्थना करावी... घरातचं रहा... सुरक्षित रहा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
				  													
						
																							
									  
	 
	गुडफ्रायडेच्या निमित्ताने भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, त्याग, सेवाकार्याचं स्मरण केलं असून भगवान येशूंची मानव कल्याणाची शिकवण आचरणात आणावी असेही अजित पवार यांनी सांगितले. 
				  				  
	 
	गुडफ्रायडेच्या निमित्तानं भगवान येशूंच्या प्रेम, त्याग, दया, क्षमा, शांतीसारख्या उदात्त विचारांचं, मानवसेवेच्या कार्याचं स्मरण करण्याची आवश्यकता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	मानवजातीच्या कल्याणासाठी भगवान येशूंनी प्राणांचं बलिदान दिले. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेले विचार मानवजातीचं सदैव कल्याण करत राहतील. आज कोरोनामुळे मानवजात संकटात असताना भगवान येशूंचा विचार, सेवाकार्याचा संदेशच आपल्याला वाचवणार आहे. कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने घरातंच थांबावं आणि कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.