शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2016 (15:37 IST)

मद्यधुंद डॉक्टर युवतीवर सामुहिक अत्याचार बनविला व्हिडियो

अमिताभ यांच्या अभिनित पिंक चित्रपटात जसे मुलीवर अत्याचार होतो.तसा काहीसा प्रकार घडला आहे. मित्रांनी सोबत दारू पार्टी करत आपल्या डॉक्टर मैत्रिणीवर सामुहिक बलात्कार केला आहे.तर यातील त्यांच्या एका मैत्रिणीने या प्रकरचा व्हिडियो बनविला आहे.
 
नाशिक जवळील असलेल्या  देवळाली कॅम्पपरिसरात हि घटना घडली आहे.  देवळाली हा लष्करी अधिकारी राहत असलेला सर्वात प्रतिष्ठीत आणि हाय क्लास झोन आहे.
 
कँम्पच्या बार्न्स स्कूल परिसरात सलग दोन दिवस आपल्या डॉक्टर मैञीणीवर बलात्कार करणाऱ्या तीन मिञांसह या प्रकाराचे चिञीकरण करणाऱ्या तरूणीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
 
यामध्ये पिडीत असलेल्या २३ वर्षीय डॉक्टर तरूणीने दिलेल्या  फिर्यादीनुसार, देवळाली कॅम्प पोलीसांनी ऋषभ मंगलनरबहादूर सिंग,योगेश पोपटकर, गणेश कुटे,या तिघांसह पायल नामक तरूणी विरूध्द गु.र.नं ९०/२०१६ भादंवि ३७६ (ड ),३२८,५०६,५०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
 उच्चभ्रू वस्तीत ही डॉक्टर मुलगी राहते. तर याच भागात असलेल्या बार्न्स स्कूल परिसरातील एकाचा या तरुणीशी मैञीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर अधून मधून मिञमंडळींच्या पार्ट्याही होत होत्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे ही मिञ मंडळी दोन दिवस संशयीत ऋषभ रा.मल्हारबाबा नगर,बार्नस्कुल रोड,देवळाली कॅम्प येथील राहत्या घरी पार्टीसाठी एकञ आले होते.
 
राञी २.३० वा.पर्यंत पार्टी संपल्यानंतर तीन मिञांनी तरूणीवर सामुहीक अत्याचार केला. त्यात कहर असे की हा प्रकार पायल नामक तरूणीने मोबाईलच्या कॅमेऱ्यात चिञीत केला आहे.सलग दोन दिवस हा प्रकार सुरू होता अशी तक्रार स्वःत पिडित डॉक्टर तरूणीने देवळाली कॅम्प पोलीस स्थानकात दिली असून दारू पितांना त्यात काहीतरी टाकल्याचा संशयही तरूणीने आपल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या प्रकरणात एकाला अटक केली असून पोलीस अजून तपास करत आहेत.