गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मे 2023 (16:48 IST)

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड

tuljapur
तुळजापूर : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुस्लिम मुलांनी जबरदस्ती चादर चढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराष्ट्रात चर्चांना उधान आले. तसेच, आता राज्याची कुलस्वामिनी मा तुळजाभवानी मातेच्या मंदिरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आजपासून मंदिरात अभद्र कपडे घालून येणार्‍यांवर बंदी लावण्यात आली आहे. मंदिरात एक बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर लिहिले आहे की जे लोकं अश्लील आणि अभद्र कपडे घालून येतात त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय संस्कृती आणि सभ्यताचे भान ठेवावे. 
 
तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिरच्या अधिकार्‍यांनी एक नियम बनवला आहे. मंदिरात या नियमाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. बरमूडा शॉर्ट्स, हाफ पँट, भडकाऊ कपडे आणि अश्लील कपडे घालून येणार्‍यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 
 
18 मे रोजी कलेक्टर आणि अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात मंदिर आणि मंदिर परसरात भारतीय संस्कृतीशी संबंधित बोर्ड लावण्यात आले आहे. या प्रसंगी मंदिर संस्थानाचे तहसीलदार आणि प्रबंधक प्रशासन सौदागर तांदळे आणि सहायक प्रबंधक धर्मिका नागे शितोळे यांचे सर्व पुजार्‍यांद्वारे अभिनंदन करण्यात आले. या वेळेस  अधिकारी कर्मचारीसोबत सुरक्षा गार्ड ही उपस्थित होते. 
 
महिलांसाठी देखील वेगळे नियम 
वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉट पँट घालून येणार्‍या महिलांना म‍ंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. फक्त महिलाच नव्हे तर पुरुषही शॉर्ट पँट घालू शकणार नाही. मंदिराने ड्रेस कोडबद्दल कडक नियम बनवले आहे. तसेच महिलांसोबत पुरषांनाही हे नियम  पाळावे लागणार आहे. 
Edited by : Smita Joshi