सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (07:43 IST)

एकनाथ खडसेंनी आता प्रचार थांबवला पाहिजे, त्यांनी आराम करावा

girish mahajan
जळगाव दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा आमने-सामने आली आहे. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेही पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. एकनाथ खडसेंनी आता प्रचार थांबवला पाहिजे, त्यांनी आराम करावा, अशी टीका भाजपा नेते गिरीश महाजनांनी खडसेंना उद्देशून केली होती.
 
गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीश महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले, “गिरीश महाजन यांना आता माझी भीती वाटायला लागली आहे. म्हणून ते माझा प्रचार थांबवा, असं म्हणत आहेत. मी मरेपर्यंत राजकारणी राहणार आहे आणि मरेपर्यंत मी राजकारणात सहभागी होणार आहे. जोपर्यंत माझा आवाज बुलंद आहे, तोपर्यंत मी थकणारा नाही. मी जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने संघर्ष केला आहे, मी लढणार आहे.”
Edited by : Ratnadeep Ranshoor