मुख्यमंत्री उद्धव ठाकरें समोर एकनाथ शिंदेंची अट
महाराष्ट्र सरकारमधील एक मजबूत नेते आणि एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोर वृत्ती स्वीकारली असून त्यांनी सुरतमधील हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे.शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर आणि रवी पाठक यांनी सुरतमध्ये शिंदे यांची भेट घेतली होती, मात्र शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपच्या पाठिंब्या शिवाय पक्षात परतणार नसल्याचे सांगितले.
मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्वेकर यांनी शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव यांना फोनवर बोलायला लावले.ज्यात शिंदे यांनी उद्धव यांनी भाजपशी युती केल्यास ते त्यांच्यासोबत येतील, अशी अट घातली.सुरतमध्ये आपल्यासोबत शिवसेनेचे 32 आमदार आहेत, तर पक्षाचे 35 आमदार आणि दोन अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावाही शिंदे यांनी केला.