रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

ठाण्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनावे यासाठी बॅनरबाजी

भाजप-शिवसेनेची सत्तावाटपावरुन वाद सुरु आहे. यामध्ये शिवसेनेकडून आदित्य ठाकरे तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे मुख्यमंत्री म्हणून पोस्टरबाजी सुरु आहे. यानंतर आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत अशी बॅनरबाजी ठाण्यात करण्यात आली  आहे.
 
ठाण्यातील कोलबाड परिसरात एकनाथ शिंदे यांच्या नावे ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. आमच्या ठाण्याचे लाडके ढाण्यावाघ एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत हिच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे. यावर मराठी वाहतूक व्यापारी सेना संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी ठाण्यात हे बॅनर लावले आहेत.