रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (17:12 IST)

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी फेसबूकचा सहभाग, दोन नवी फीचर्स आणली

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आता त्यात फेसबूकनेही सहभाग घेतला आहे. यासाठी  फेसबूकने दोन नवी टूल्स/ फीचर्स आणली आहेत. पहिले फीचर  आहे ' रिमाईंडर'चे.. यात  ज्या राज्यात मतदान असेल त्या दिवशी संबंधित राज्यातील १८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या फेसबूक युजर्सना ' मतदाना'ची आठवण करून देण्यासाठी ' रिमाईंडर' लावण्यात येईल. फेसबूकचे हे रिमाईंडर्स निवडणूक आयोगाच्या वेबसाईटसी जोडण्यात आले असल्याने मतदार आपले मतदान केंद्र आणि मतदानासंबंधी इतर माहिती चेक करू शकतात. तसेच मतदान केल्यानंतर संबंधित मतदार ' Share You Voted' या बटणावर क्लिक करून आपल्या मित्रांना मतदान केल्याचे सांगू शकतात. पण कोणाला मतदान केले, हे मात्र त्यांना शेअर करता येणार नाही. तर दूसरे फीचर आहे ते निवडणुकीला उभे राहिलेले वा निवडून आलेल्या उमेदवारांसाठी. यात ते त्यांच्या पदासंबंधी वा कामासंबंधी २०० अक्षरांत माहिती लिहू शकतात.