महाराष्ट्र मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिली प्रतिक्रिया
Maharashtra Assembly Election News: राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार आणि मतदान याद्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. आता यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया आली आहे.
तसेच महाराष्ट्रातील मतदारांची संख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना संपूर्ण तथ्यांसह लेखी उत्तर देईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
