मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (07:57 IST)

Expansion of the State Cabinet ऑगस्टमध्येच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

Expansion of the State Cabinet in August itself राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा विस्तार याच महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वेळी मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या आणखी आमदारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे गेल्यावेळी प्रतीक्षेत असलेल्या आमदारांच्या पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या वेळी शिंदे गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार का? असा प्रश्न आहे.
 
आता होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार आहे. शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना यात संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाची अपेक्षा लावून बसलेले आहेत.
 
शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सरकार स्थापनेनंतर आतापर्यंत दोन वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यात दुस-या वेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे शिंदे गटाचे तसेच भाजपचेही आमदार नाराज झाले होते. मात्र, आता या नाराज आमदारांना खुश करण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न असणार आहे.
 
राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रिपदाच्या अपेक्षेवर पाणी फिरले होते. त्यातच आता लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात असून, ज्यात शिंदे
गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
 
खातेवाटप, पालकमंत्रिपदावरही लक्ष
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच खातेवापट आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरही सर्वांचे लक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडील महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेली आहेत. त्यामुळे शिंदे गट नाराज आहे. या वेळी मात्र विस्तारात चांगली खाती पदरात पाडून घेण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्नात असल्याचे दिसून येते.