सोमवार, 11 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (07:37 IST)

बाप्परे, पेण जवळ भोगावती नदीपात्रात सापडली स्फोटके

explosives
मुंबई गोवा महामार्गावर पेण जवळ भोगावती नदीपात्रात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. स्फोटके निकामी करण्यासाठी अलिबाग आणि नवी मुंबई येथून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
भोगावती नदी पात्रात महामार्गावरील पुलाखाली ही स्फोटके आढळून आली आहेत. डिटोनेटर आणि जिलेटीनच्या कांड्यांचा यात समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या स्फोटकांना टायमर लावल्याचे दिसून आला  आहे. 
 
 नवी मुंबई आणि अलिबाग मधील बॉम्ब शोधक पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. नदी पात्रातून स्फोटक सुरक्षितपणे बाहेर काढून निकामी करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. स्फोटके नदी पात्रात कशी आणि कुठून आली याचा तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. तसेच आसपासच्या परीसराला प्रशासनाने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor